मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणेंना समन्स बजावले
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणेंच्या अडचणीत वाढ झाली असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरले होते.मात्र, त्यांना राणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर राऊतांनी राणेंची निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणेंना समन्स बाजावले असून, राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.