वैद्यकीय शिक्षणासाठी 75 हजार जागा वाढवणार- नरेंद्र मोदींची घोषणा नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला
भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या स्वातंत्र्य दिनी अकराव्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांशी संवाद साधत त्यांना संबोधित केलं.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण त्यांनी केले. या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. भारताचा हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पाना घेऊन पुढे गेलो तर 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे :- स्वातंत्र्य मिळाले पण प्रत्येक सुविधेसाठी लोकांना सरकारकडे हात पसरावे लागले होते. मात्र आज सरकार घरोघरी नळाचे पाणी आणि गॅस सिलिंडर पोहोचवत आहे. जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.- स्पेस सेक्टर एक भविष्य आहे. महत्त्वाचा पैलू आहे. स्पेस सेक्टरमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. स्पेस सेक्टरमध्ये अनेक स्टार्टअप येत आहेत. आम्ही दूरगामी विचार करुन स्पेस सेक्टरमजबूत करत आहोत. आज प्रायवेट रॉकेट लॉन्च होत आहेत. उपग्रह सोडले जात आहेत. आज देशात नवीन संधी निर्माण झाल्या. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरच निर्माण आणि सामन्य माणसासाठी इज ऑफ लिव्हिंगवर भर दिला आहे, असं पंतप्रधान म्हणाले.- मध्यमवर्गीय देशाला भरपूर काही देतो. त्यामुळे देशाची पण त्याच्याप्रती जबाबदारी आहे. मी स्वप्न बघितलय 2047 पर्यंत लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे. गरज असेल तेव्हा सरकार तिथे असेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.- आम्ही देशवासीयांसाठी 1500 हून जास्त कायदे रद्द केले, जेणेकरून लोक या गोंधळात अडकू नयेत. छोट्या छोट्या कारणांसाठी तुरुंगात जावं लागत होतं, ते कायदेही आम्ही रद्द केले. कित्येक वर्षांपासून आपल्याकडे जे गुन्हेगारी कायदे होते, ते आम्ही बदलले असं पंतप्रधानांनी नमूद केलं. गेल्याअनेक वर्षांपासून आपल्याकडे गुन्हेगारी कायदे होते. आता आम्ही न्यायसंहिता आणली आहे. आता दंड नव्हे तर न्यायाच्या भावनेला तयार केलं आहे,असं ते म्हणाले.- विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज आहे. चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे विद्यार्थ्यांची आवड वाढली आहे. ही आवड योग्य दिशेने नेण्यासाठी संस्थांना पुढे यावे लागेल. संशोधनासाठी सरकारने मदत वाढवली आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात 1 लाख कोटी रुपयांचा निधी आम्ही संशोधन आणि विकासासाठी दिला आहे.आपण मिशन मोडवर इज ऑफ लिंव्हिंगसाठी काम केलं पाहिजे, असं मी लोकप्रतिनिधींना आवाहन करतो . युवक, प्राध्यापकांना आवाहन करतो की तुम्हाला भेडसावणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींबाबत सरकारला पत्र लिहा. या अडचणींवर असलेल्या उपायांबद्दल सांगा. कोणतेही कारण नसताना उभ्या राहिलेल्या या अडचणींविषयी सरकारला पत्राद्वारे सांगा. देशातील प्रत्येक सरकार संवेदनशील आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्था असो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार तुम्ही लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जाईल, याचा मला विश्वास आहे.मेडीकल शिक्षणावर लाखो रुपये खर्च होतात. यात आम्ही मागच्या 10 वर्षात मेडीकल सीट वाढवून 1 लाख केल्या आहेत. दरवर्षी 25 हजार विद्यार्थी मेडीकल शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं. पुढच्या पाच वर्षात मेडीकल क्षेत्रात 75 हजार नवीन जागा निर्माण करणार आहोत. 2047 साली विकसित भारत स्वस्थ भारत असला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले.