राजापूर शहरालगतच्या बारसू येथील नेपाळी कामगारांनी वहाळाच्या पाण्यात विषारी औषध मिसळल्याने मासे मृत
राजापूर शहरालगतच्या बारसू येथील नेपाळी कामगारांनी वहाळाच्या पाण्यात विषारी औषध मिसळल्याने मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले आहेत. ग्रामस्थांना याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी संबंधित नेपाळी कामगारांची बोकांडी धरून पोलीस स्थानक गाठले.बारसू येथील एका बागेत काम करणार्या नेपाळी कामगारांनी शनिवारी रात्रीच्या वेळी वहाळाच्या पाण्यात विषारी औषध टाकल्याने सकाळी वहाळातील मासे तसेच खेकडे मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या वहाळालगतच बारसू गावातील अनेक विहिरी आहेत. तर काहीजण वहाळातील पाणी बागाययतींसाठी वापरत आहेत. तसेच जनावरे वहाळातील पाणी पीत असल्याने जनावरांच्या जीवितालाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नेपाळी कामगारांना पकडून पोलीस स्थानकात नेले. www.konkantoday.com