
विनेश फोगाटची प्रतीक्षा पुन्हा वाढली! रौप्यपदकाचा निर्णय ‘या’ दिवशी जाहीर होणार!!
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची सांगता झालेली आहे. मात्र, त्यानंतरही विनेश फोगाटच्या खटल्याचा निर्णय अजून यायचा आहे. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) मंगळवारी (13 ऑगस्ट) आपला निर्णय जाहीर करणार होते. आता न्यायालयाचा निर्णय १६ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजता येणार आहे. हा निर्णय विनेशच्या बाजूने आल्यास तिला रौप्यपदक मिळेल. मात्र, जर निर्णय तिच्या विरोधात आला तर विनेशसह सर्व भारतीयांची निराशा होईल.