
परचुरीत बिबट्याचा धुमाकूळ
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून रात्रीच्या दरम्यान येणार्या बिबट्याने कुत्र्यांसह घरातील पाळीव कोंबड्यांना आपले लक्ष्य केले आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले असून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा वावावा, अशी मागणी होत आहे. परचुरी गावात रात्रीच्या दरम्यान बिबट्या येत असल्याने भीतीचे वातावरण आहे. बिबट्या पाळीव कुत्र्यांबरोबर घरातील कोंबड्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी चिखलांच्या ठिकाणी बिबट्याचे पंजे उमटलेले दिसत आहेत. www.konkantoday.com




