पकडलेली गुरे कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या मालकांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही गुरे पालिकेत आणून बांधू- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

रत्नागिरी शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. पालिकेने तत्काळ यावर उपाययोजना करून गुरे आणि कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करावे. पकडलेली गुरे कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या मालकांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही गुरे पालिकेत आणून बांधू, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला. शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आज पालिकेवर धडकले. शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विभागप्रमुख शेखर घोसाळे, प्रसाद सावंत, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते. शहरामध्ये मोकाट गुरांचा गंभीर प्रश्न आहे. एक संस्थेने केलेल्या सर्व्हेमुळे सुमारे अडिचशे मोकाट गुरे असल्याचे पुढे आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button