कोकणी माणसाबद्दल चुकीचं वक्तव्य केलं. त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो-मुनव्वर फारुकी
* स्टॅड अप कॉमेडियन आणि बिग बॉस स्पर्धक मुनव्वर फारुकी कायमच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. असंच विधान नुकतंच त्याने एका स्टँड अपशोमध्ये केलं आहे. पण यावेळी त्याने महाराष्ट्रातील कोकणी माणसाशी पंगा घेतला आहे.त्यामुळे चहुबाजूंनी त्याच्यावर टिका होत आहे.मुनव्वर फारुकीने एका कार्यक्रमात कोकणी माणसाबद्दल अपशब्द काढले होते. त्याच्या या व्हिडीओचे पडसाद राजकीय वर्तुळातही पडले. राज ठाकरे यांच्या मनसेने मुनव्वरला शोधणाऱ्याला 1 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. तर भाजप नेते नितेश राणेंनी मुनव्वरचा ‘हिरवा साप’ असा उल्लेख केला आहे.काही दिवसांपूर्वी एक शो झाला होता. या कार्यक्रमात चाहत्यांशी बोलताना काही गोष्ट निघाल्या. जी कॉमेडी देखील नव्हती. कोकणी लोकांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. मला माहित आहे, तळोज्याला खूप कोकणी लोक राहतात. माझे खूप मित्र देखील आहेत. तेव्हा थोडं विषयांतर झालं होतं. आणि मी कोकणी माणसाबद्दल चुकीचं वक्तव्य केलं. त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. माझं काम लोकांना हसवणं आहे. मला कुणालाच दुखवायचं नाही. त्यामुळे झालेल्या प्रकाराची मी मनापासून माफी मागतो, असा माफीनामा मुनव्वर फारुकीने आपल्या X अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.तुम्ही सगळेजण बॉम्बे म्हणजे मुंबईतून आलात की? कुणी प्रवास करुन आलंय, असा प्रश्न मुन्नवरने कार्यक्रमात विचारलं. तेव्हा एका व्यक्तीने आम्ही तळोज्याहून आल्याचं सांगितलं. तेव्हा मुन्नवर म्हणाला की, आता विचारलं तर सांगत आहेत. तळोजे मुंबई बाहेर झालं. यांचे गाववाले विचारत असतील तर सांगत असतील, मुंबईत राहतो. हे कोकणी लोक चु** बनवतात सगळ्यांना.मुन्नवर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या लोकांना तळोजे वरुन आलेल्या व्यक्तीला तू कोकणी आहेस का? असा देखील सवाल केला. आणि तो देखील हो म्हणाला. यावर मुन्नवर फक्त हसला…