
नव्या जगबुडी पुलावरील दुरूस्तीचे काम पूर्ण
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरील एका मार्गिकेचा मध्यभाग उखडल्याने सुरू असलेली दुरूस्ती अखेर २४ दिवसानंतर पूर्ण झाली आहे. सळ्यांसह सिमेंटचा वापर करून मध्यभाग सुस्थितीत आणण्यात आला आहे. आता या पुलावरील मार्गिका खुली होण्याची वाहनचालकांना प्रतीक्षा आहे.नव्या जगबुडी पुलावरील एका मार्गिकेचा मध्यभाग उखडल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ठेकेधारक कंपनीने तातडीने उखडलेल्या मध्यभागाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले मात्र मुसळधार पावसामुळे दुरूस्ती कामात अडथळा निर्माण झाला होता. दुरूस्ती कामाची गती मंदावली होती. अखेर उखडलेल्या दुरूस्तीचे काम शुक्रवारी पूर्ण झाले. उखडलेल्या मध्यभागी सळ्या टाकून त्यावर सिमेंट पसरवले आहे. www.konkantoday.com