
महाड विधानसभा मतदारसंघात विकासाच्या पोकळ घोषणा अनेक धनगरगरवाड्यांवर रस्तेच नसल्याने आजारी रूग्ण व मयत व्यक्तींचा डोलीने प्रवास*, *पहा व्हिडिओ
-स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन महोत्सव साजरा होत असताना महाड विधानसभा मतदारसंघात अनेक धनगरवाड्यांवर रस्त्यांची मुलभूत परिपूर्ण सोय नसल्याने आजारी रूग्ण व मयत व्यक्तींना आजही डोलीने घेऊन जावे लागत आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे धनगरवाड्यांच्या विकासाकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने धनगर समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. दिनांक ९/८/२०२४ रोजी महाड तालुक्यातील चिंभावे धनगरवाडीतील रहिवासी कै.दिपेश विठ्ठल माने यांचे ठाणे येथे आकस्मित निधन झाले होते.त्यांचा मृतदेह रूग्णवाहीकेने वाकवली गावापर्यंत आणण्यात आला.परंतू वाकवली ते चिंभावे धनगरवाडी हे अंदाजे ४ किमी अंतर रात्रीच्या अंधारात डोलीच्या साहाय्याने पार करताना ग्रामस्थांची जी हालअपेष्टा झाली ते भयानक दृश्य पाहून पुर्ण जगातील जनता गहिवरली आहे. चिंभावे धनगरवाडी हि महाड विधानसभा व रायगड लोकसभा मतदारसंघात मोडत आहे.येथील आमदार/खासदार विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारतात परंतु या दोन्ही लोकप्रतीनीधींचे नेहमीच मागासवर्गीय धनगर समाज वाड्यावस्त्यांच्या विकासाकडे लक्ष नसते. महाड तालुक्यातील धनगरवाड्यांच्या विकासाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर महाड तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिला आहे. रामचंद्र बाबू आखाडे सामाजिक कार्यकर्ते संपर्क नं – 9222807942