
निसर्ग चक्रीवादळात भरकटलेल्या मालवाहू जहाजांवरील १३ कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले
निसर्ग वादळामुळे रत्नागिरी जवळच्या समुद्रात नांगर टाकून उभे असलेल्या एसपी बसरा स्टार या डिझेल वाहतूक करणारे जाहाज आज पहाटे झालेल्या चक्रीवादळात भरकटले गेल्यामुळे मिर्या समुद्र किनाऱ्याजवळ आले.या जहाजावर असणाऱया १३ कर्मचाऱ्यांना प्रादेशिक बंदर अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणले.बसरा स्टार हे मालवाहू जहाज दुबईहून निघून मुंबईमार्गे कारवारला डिझेल घेऊन गेले होते ते परतत असताना अचानक समुद्रात निसर्ग चक्रीवादळामुळे वातावरण बिघडले त्यामुळे जहाजावरील कॅप्टनने डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग येथे संपर्क साधला.या जहाजाला मुंबई येथे येण्यास कळवण्यात आले होते परंतु अचानक समुद्रात वातावरण बिघडल्यामुळे हे जहाज मुंबई येथे जाऊ शकत नव्हते म्हणून जवळच्या किनाऱयावर हे जहाज नेण्यास सांगण्यात आले होते.त्यामुळे हे जहाज भगवती बंदर जवळील समुद्रात नांगर टाकून उभे होते.त्याच दरम्यान रत्नागिरी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ आले त्याच्या तडाख्यात हे जहाज सापडले.जहाजाचे नांगर तुटल्याने हे जहाज आज सकाळी भरकटत मिर्या येथील पांढरा समुद्र किनारी आले.या जहाजावर एकूण १३ कर्मचारी होते त्यापैकी १० कर्मचारी भारतीय तर ३ कर्मचारी परदेशी नागरिक होते .जहाज मिर्या समुद्रकिनारी आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जहाज पाहण्यासाठी गर्दी केली होती.समुद्रात उसळणाऱ्या मोठ्या लाटांमुळे जाहाज खडकावर आपटून त्याला छीद्र पडल्याने जहाज किनाऱ्यावरच आहे.वातावरण निवळल्यानंतर या जहाजावरील कर्मचाऱयांना प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले व त्यांच्या सहकाऱयांनी किनाऱयावर आणले.मात्र सध्या करुणाची साथ मोठ्या प्रमाणावर असल्याने या जहाजावरील कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांचे कोरोनाचे स्वॅब घेण्यात येणार आहेत त्यांना सध्या क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे.
www.konkantoday.com