लाडकी बहीण योजनेसाठी पैसे जमा होण्याची पहिली चाचणी आज यशस्वी-बाल विकासमंत्री आदिती तटकरे
*लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केलेल्या नारीशक्ती अॅपच्या माध्यमातून आलेल्या अर्जांपैकी गेल्या 2 दिवसांत तब्बल 1 कोटी 5 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. दोन दिवसांत या अॅपवर 1 कोटी 41 लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यामुळे, सरकारकडून आता योजनेच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात (Bank) या योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये जमा होणार आहे. त्यासंदर्भातील पहिली चाचणी आज यशस्वी झाल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री तटकरे यांनी दिलेल्या या माहितीमुळे राज्यातील 1 कोटींहून अधिक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे.