कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग
कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. गुरुवारी (दि.८) रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. .शुक्रवारी (दि. 9) होणाऱ्या संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134 व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कुस्तीमैदानाकडील बाजूस आगीच्या ज्वाला दिसून आल्या. नाट्यगृह इमारतीचे बहुतेक सामान्य लाकडी असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेले नाही. परंतु केशवराव भोसले नाट्यगृहाचा काही भाग कोसळला असून छत कोसळले आहे. केशवराव भोसले जयंतीच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे कोल्हापूरकर हळहळले आहेत.