
आदर्श वसाहत कारवांचीवाडी येथे 5 एप्रिलला श्री साई मंदिराचा वर्धापन दिन तर ६ एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव
रत्नागिरी : आदर्श वसाहत कारवांचीवाडी येथे श्री साई सेवा मंडळाच्यावतीने शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी श्री साईबाबा मंदिराचा नववा वर्धापन दिन आणि रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी श्री साई मंदिरात श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 5 एप्रिल रोजी श्री साई मंदिरात काकड आरती, अभिषेक, दुपारी महाप्रसाद आणि श्री साई भंडारा त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन आणि रात्री नऊ तीस वाजता अक्षय थिएटर्स रत्नागिरी तर्फे महावस्त्रहरण हे नाटक होईल.त्यानंतर रात्री बारा वाजता शेजारती संपन्न होईल.
रविवार दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी आरती, ११ वाजता ह भ प प्रसन्न जोशी यांचे श्री राम जन्मोत्सवावर आख्यान आणि कीर्तन होईल. दुपारी श्री सत्यनारायणाची महापूजा, यानंतर सायंकाळी ४ वाजता रवींद्र नगर येथील श्री माऊली महिला मंडळाचे भजन संपन्न होईल. सायंकाळी ५ ते ७ वाजता खिचडी प्रसाद आणि लहान मुलांचे फनी गेम्स होतील. त्यानंतर श्री भवानी घाडगेेश्वर प्रासादिक मंडळाचे भजन रात्री ९.३० वाजता आणि रात्री बारा वाजता शेजारती होईल. या उत्सवांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री साई सेवा मंडळाच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.