उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाहीच,काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठे वक्तव्य
राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊउद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाहीच,न ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून विविध रणनिती आखली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरु आहेत.त्यातच आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाहीच, असे विधान केले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.“जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जातो, तेव्हा कोणताही चेहरा समोर ठेवत नाही. मुख्यमंत्री पदासाठी एखाद्या चेहऱ्याची गरज नाही. कारण आम्ही महाविकास आघडीच्या जाहीरनाम्यावर विधानसभेची निवडणूक लढणार आहोत. त्यानंतर सत्तेत आल्यावर आमचा जाहीरनामा पूर्ण करणार आहोत. निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात, त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळते, अशी आमची परंपरा आहे. मग ते मुख्यमंत्रीपद कोणत्या व्यक्तीला द्यायचं, ते त्या-त्या पक्षातील नेते ठरवतात”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.