बुद्धिबळ स्पर्धेत ओंकार सावर्डेकर अजिंक्य फीडेच्या जास्तीत जास्त गेम्सच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यादीत रत्नागिरीचा समावेश

रत्नागिरी चेस अकॅडमी तर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खुल्या एकदिवसीय स्पर्धेत चिपळूणच्या ओंकार सावर्डेकर याने अजिंक्य राहून विजेतेपद पटकावले. रत्नागिरीच्या सौरीश कशेळकर याला उपविजेतेपद तर सोहम रुमडे याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. २४ तासात संपूर्ण जगभरात खेळल्या गेलेल्या जास्तीत जास्त गेम्स च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ही स्पर्धा पात्र ठरली असून सर्व स्पर्धकांना व आयोजकांना त्या अटेंप्ट बद्दल जागतिक बुद्धीबळ संघटनेकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.उज्ज्वला क्लासेस रत्नागिरी यांचे स्पर्धेला प्रायोजकत्व लाभले होते. सदर स्पर्धेत एकूण १७२ खेळाडू सहभागी झाले होते व जिल्हास्तरीय स्पर्धेतील हा देखील एक विक्रम करुन दाखविल्याबद्दल उज्ज्वला क्लासेस च्या पुरुषोत्तम पाध्ये यांनी सर्व खेळाडू, पालक, क्रीडा शिक्षक व बुद्धिबळ प्रशिक्षक यांचे आभार मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रत्नागिरी चेस अकॅडमीचे संचालक विवेक सोहनी, वरद पेठे, चैतन्य भिडे, मानस सिधये तसरच उज्ज्वला क्लासेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सीए दीपाली पाध्ये, सीए शरद वझे तसेच ॲडवोकेट गौरव महाजनी यांच्यासह सीएस पुरुषोत्तम पाध्ये उपस्थित होते.स्पर्धा एकूण ७ फेऱ्यांमध्ये साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. सदर स्पर्धेत खेळले गेलेले एकूण ५८७ गेम्स गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस साठी पात्र ठरले. स्पर्धेचा विस्तृत निकाल खालीलप्रमाणे :खुला गट :प्रथम : ओंकार सावर्डेकर, द्वितीय : सौरीश कशेळकर, तृतीय : सोहम रुमडे, चार ते दहा अनुक्रमे : सई प्रभुदेसाई, अनंत गोखले, यश गोगटे, शुभम बेंद्रे, आयुष रायकर, वरद पेठे, श्रीहास नारकर.उत्तेजनार्थ बक्षिसे: सर्वोत्कृष्ठ वरिष्ठ खेळाडू : सुनील शिंदेसर्वोत्कृष्ठ महिला खेळाडू :निधी मुळ्ये, अस्मी गांधी १५ वर्षे वयोगट : चिराग प्रभुदेसाई, मृणाल कुंभार १४ वर्षे वयोगट : आर्यन धुळप, सोहम बावधनकर१३ वर्षे वयोगट : सर्वेश दामले, यश काटकर १२ वर्षे वयोगट : ओम उतेकर , शाल्व कारेकर ११ वर्षे वयोगट : आराध्य गर्दे, अलिक गांगुली १० वर्षे वयोगट : विहंग सावंत, नील कुडाळी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button