
मत्स्य संवर्धनावरील विकास पथदर्शी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी
राज्याच्या कोकण विभागातील अनुसुचित जाती समुहातील लोकांच्या अन्नसुरक्षा आणि त्यांचे ग्रामीण जीवन उंचावण्यासाठी मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानावर आधारित संशोधन आणि विकास पथदर्शी प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर झालेला होता. रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय शिरगांवच्या प्रकल्पाला १ कोटी ७८ लाख मंजूर झाले आहेत.
राज्यातील कृषी विद्यापीठात अशा प्र्रकारचा पहिलाच संशोधन प्रकल्प आहे. शिरगांव मत्स्य महाविद्यालय येथील डॉ. बी. आर. चव्हाण आणि विभाग प्रमुख मत्स्य अभियांत्रिकी विभाग यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक संशोधन प्रकल्प मंजूर झाला आहे.
www.konkantoday.com
