ताम्हिणी घाटातील रस्त्यांवर पडलेल्या तडया मुळे दापोलीतील काही एसटी मार्गावर परिणाम

_रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटातील रस्त्यांना पडलेल्या तडयाचा दापोली एसटी आगाराला फटका बसला आहे. या तड्यांमुळे दापोली-पुणे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.रायगड व पुणे जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी हा महत्वाचा घाट आहे. या घाटातील रस्त्यांना दरड कोसळल्यामुळे तडे गेले आहेत. यामुळे पुणे जिल्हाधिकारी यांनी ताम्हिणी घाटातील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार दापोलीवरून पुण्याला ताम्हाणीमार्गे जाणारी एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर भोर घाटाचे कामही सुरू असल्यामुळे भोर मार्गे पुण्याला जाणारी एसटीही बंद ठेवण्यात आली आहे. दापोलीहून महाबळेश्‍वरमार्गे पुण्याला जाणारी पूर्वी एसटी सेवा होती. मात्र आता महाबळेश्‍वर येथे प्रचंड प्रमाणात धुके असल्यामुळे या मार्गाने एसटी वचाहतुकीस परवानगी देण्यात येत नाही. यामुळे सध्या दापोली व पुण्याचा संपर्क एसटी बंद असल्यामुळे पूर्णपणे ठप्प झाला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button