हे पैशावर झोपणारे लोक आहेत त्यांना गरिबांच्या भावना कळणार नाही. कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका.’-जरांगे पाटील यांची राज ठाकरेंवर टीका
‘हे पैशावर झोपणारे लोक आहेत त्यांना गरिबांच्या भावना कळणार नाही. कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका.’ असं आवाहन मनोज जरांगे यांनी धाराशिवमधील मराठा आंदोलकांना केले आहे.राज ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरेनी मराठा आंदोलकांना भेट नाकारली. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.यांच्या तोंडापुढं देखील उभे राहू नका. हे पैशावर झोपणारे लोक आहेत यांना भावना आणि आरक्षण काय आहे ते कळत नाही. बांग्लादेशमधील परिस्थिती पेक्षा जास्त मस्ती महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना आहे. गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत.’ अशी टीका जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर के