विशाळगडावरील 144 कलम हटवून तेथील जनजीवन पूर्ववत करावं. गजापूरमधील नुकसानग्रस्तांना रोज एक हजार रुपयांप्रमाणे भरपाई द्यावी.- समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांची मागणी
राजर्षी शाहू महाराज यांनी सर्वात आधी आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये शाहू महाराज यांनी मुस्लिम समाजाचा देखील सहभाग करून घेतला होता. राजर्षी शाहूंनी समतेचा संदेश दिला होता.त्यांच्या नगरीमध्ये विशाळगड, गजापूरमध्ये दंगल होणं हे अतिशय दुर्दैवी आहे, असंही समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी म्हटलं आहे.याबाबत राजर्षी शाहूंच्या वंशजांवर मी काही बोलणार नाही; पण त्यांच्या कुटुंबीयांनी आता सामाजिक सलोख्यासाठी शाहूंचा समतेच्या विचार देशभरात न्यावा, त्याचा प्रसार करावा, शाहू महाराज यांनी खूप मोठं काम केलं आहे. त्यांचे काम पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी करावं असं आवाहन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी गजापूरला भेट दिल्यानंतर कोल्हापुरात पत्रकारांशी संवादसाधताना म्हटलं आहे.अबू आझमी म्हणाले, विशाळगडावरील 144 कलम हटवून तेथील जनजीवन पूर्ववत करावं. गजापूरमधील नुकसानग्रस्तांना रोज एक हजार रुपयांप्रमाणे भरपाई द्यावी. पोलीस अधीक्षक समोर असताना त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलं आहे. सरकारने त्यांना तातडीने निलंबित केलं पाहिजे. शाहू महाराज यांच्या भूमीत असं घडत आहे हे योग्य नाही.संभाजी भिडे यांची 12 तारखेला होणारी सभा थांबवली पाहिजे. 14, 15, 16 तारखेला सरकाने कोणतीही कारवाई केली नाही. 144 कलम दूर केलं पाहिजे, त्याठिकाणी नागरिकांना येऊ दिलं पाहिजे.