जनतेसाठी २४ तास सेवा बजावणारे रुग्णवाहिका चालक करतायेत गळक्या इमारतीत वास्तव्य
देवरूख ग्रामीण रूग्णालयाच्या रूग्णवाहिकेवर कार्यरत असलेले चालक ज्या इमारतीत वास्तव्यास आहेत, त्या इमारतीला गळती लागली आहे. छताला अक्षरशः प्लास्टिक कागद व जमिनीवर पाण्यासाठी बादल्या लावण्यात आल्या आहेत. भिंतीना आतून ओल आली आहे. २४ तास सेवा बजावणारे चालक नाईलाजाने या गळक्या इमारतीतून वास्तव्य करत जतनेची सेवा करत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.www.konkantoday.com