मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत अवघ्या १५ दिवसात जिल्ह्यातील जवळपास ३५ उद्योजक व १ हजार उमेदवारांची महास्वयंम पोर्टलवर नोंदणी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत अवघ्या १५ दिवसात जिल्ह्यातील जवळपास ३५ उद्योजक व १ हजार उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केली आहे.त्यापैकी १३ उद्योजक व शासकीय आस्थापनात १०८ उमेदवार रुजू करून घेण्यात आलेले आहेत. महसूल पंधरवड्यानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले.महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर उद्योजक आणि शासकीय आस्थापनांमध्ये रूजू झालेल्या ठिकाणात ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगर शेती सहकारी दापोली येथे ६ प्रशिक्षणार्थी, गद्रे मरीन येथे २२, लक्ष्मी काजू प्रक्रीया येथे १६ , श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी (दापोली) येथे १, सुर्वे ग्रुप लोटे परशुराम (चिपळूण) येथे २१, स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेत (रत्नागिरी) ५, राजापूर को-ऑपरेटीव्ह बँक १७, झिलानी मरीन मिरजोळे येथे ५, राजापूर तालुका कुणबी सहकारी संस्था ३, जिल्हा परिषद ९, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्ररोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळ आणि नगर रचना आणि मुल्य निर्धारण विभाग प्रादे‍शिक योजना येथे प्रत्येकी १ असे एकूण १०८ प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त उद्योजक व उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमती शेख यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button