माध्यमातून वृत्त प्रसिद्ध होताच ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या या शवविच्छेदन गृहाबाहेर व रस्त्यावर वाढलेली झाडी व रस्त्याची सफाई
_राजापूर तालुक्यातील रूग्ण सेवेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मृत्यूनंतरही एखाद्या रूग्णाच्या मरणयातना संपत नाहीत अशी परिस्थिती शविवच्छेदन गृहांबाबत िनर्माण झाली आहे. राजापूर ग्रामीण रूग्णालयातील शवविच्छेदन गृहाचे काम सुरू असल्याने सध्या शवविच्छेदनासाठी ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह ठेवले जात आहेत. मात्र या शवविच्छेदन गृहापर्यंत मृतदेह नेणाऱ्यांना आणि त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी जाणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तेथे पोहचण्यासाठी यातायात करावी लागत आहे.ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या या शवविच्छेदन गृहाबाहेर व रस्त्यावर वाढलेली झाडी, रस्त्यावर पसरलेला चिखल यामुळे डॉक्टर आणि कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणी पोहचावे लागत होते. याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध होऊन या दुरवस्थेला वाचा फोडली होती. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या आरोग्य प्रशासनाने ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन गृहाकडे जाणारा झाडे आणि वेलींमुळे गडप झालेला रस्ता सर्व झाडे आिण वेली बाजुला करून मोकळा केला आहे. तर रस्त्यावर पसरलेल्या िचखलाचे साम्राज्य बाजुला करून रस्त्याची सफाई करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे