
खेड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे धान्य गोदाम डागडुजीच्या प्रतीक्षेत
खेड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे समर्थनगर येथील धान्य साठवणुकीचे एक गोदाम दोन वर्षापूर्वी जमीनदोस्त झाल्यानंतर धान्य साठवणुकीचा अतिरिक्त भार एम. बी. शेड धान्य गोदामावर पडत आहे. या गोदामाच्या डागडुजीसाठी पुरवठा विभागाकडून पत्रव्यवहाराचा सपाटा सुरू असतानाही अद्याप दाद देण्यात आलेली नाही. गोदामासाठी जोता उंदीर, घुशी पोखरत असून धान्याचीही नासाडी होत आहे. हे गोदाम अजूनही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असून आणखी किती दिवस याच ठिकाणी तुटपुंज्या जागेत धान्य ठेवायचे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. www.konkantoday.com




