दानशूर भागोजी शेठ कीर, संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचे पुतळे उभारण्यासाठी विविध प्रक्रिया पूर्ण निवडणूक आचारसंहितेपूर्वी लोकार्पण होणार : पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही.
रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी शहरात साळवी स्टॉप येथे दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर आणि जयस्तंभ येथील कान्हेरे उद्यानात संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांच्या उभारणीसाठी आर्थिक निधीची तरतूद करून विविध प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आगामी निवडणूक आचारसंहितेपूर्वी या पुतळ्याचे लोकार्पण केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री उदयजी सामंत यांनी आज रत्नागिरी दौऱ्यात दिली. कुवारबाव येथील ज्येष्ठ नागरिक भवनात कुवारबाव गाव भेटीचा कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी मंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर जेष्ठ नागरिक श्री. प्रभाकर कासेकर आणि समाजभूषण श्री. सुरेंद्र घुडे यांनी मंत्री महोदयांचे यांचे स्वागत करून पुतळे उभारण्याची घोषणा व्हावी, अशी विनंती केली असता ना . सामंत यांनी पुतळे उभारण्याच्या प्रगतीची माहिती दिली. तसेच कुवारबावच्या घनकचरा निर्मूलनाची समस्या स्टरलाईटच्या जागेत होणाऱ्या सामूहिक प्रकल्पाद्वारे पूर्ण होईल, असे सांगितले. या मेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालायावेळी ना. सामंत यांनी शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, नवजात बालिकांसाठीची लेक लाडकी योजना तसेच ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनांचा पात्र लाभार्थीना फायदा करून देण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.