
रत्नागिरीच्या निसर्गयात्री संस्थेलाराष्ट्रीय स्तरावर “गोल्ड अवॉर्ड”ने सन्मानित.
‘निसर्गयात्री संस्थेला’ ICRT (International centre for Responsible Tourism, UK) तर्फे ICRT India Foundation द्वारा आयोजित ICRT India & Sub Continent Awards 2024 करिता राष्ट्रीय स्तरावर “गोल्ड अवॉर्ड”ने सन्मानित करण्यात आले. उत्तराखंडचे पर्यटन मंत्री ना. सतपाल महाराज, श्रीमती मुग्धा सिन्हा, डायरेक्टर जनरल पर्यटन, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार, डॉ. हेरॉल्ड गुडविन डायरेक्टर ICRT यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 31ऑगस्ट 2024 रोजी यशोभूमी Convention & Expo. सेंटर, द्वारका, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या BLTM ( India’s leading trade show on Business + Leisure Travel and MICE.) कार्यक्रमात कोंकणातील कातळशिल्प (Geoglyphs), जैवविविधता आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रात करत असलेल्या कामाबद्दल ‘निसर्गयात्री संस्थेला’ ICRT तर्फे Nature Positive या विभागात “गोल्ड” अवॉर्ड हा देण्यात आला. ( ICRT India & Sub Continent Award मध्ये गोल्ड अवॉर्ड पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्था यांचा ICRT Global Award साठी थेट समावेश करण्यात येतो.)यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे एमडी श्री मनोजकुमार सुर्यवंशी, डायरेक्टर श्री. चंद्रशेखर जैयस्वाल, श्री अमित ताम्हाणे, श्रीमती मानसी कोठारे यांसह देशविदेशातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, संस्था प्रतिनिधी, हॉटेल्स आणि टूर व्यावसायिक उपस्थित होते. ICRT ही एक पर्यटन क्षेत्रात काम करणारी UK स्थित एक आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन आहे. ऑस्ट्रेलिया, बार्सोलीना, ब्राझील, कॅनडा, चायना, फिनलॅड, इंडिया, साऊथ ईस्ट आशिया, आयर्लंड, रशिया, श्रीलंका, स्वीडन, आफ्रिका याठिकाणी ही ऑर्गनाझेशन कार्यरत आहे. या अशा आंतरराष्ट्रीय संस्थेने स्वतःहून दखल घेत निसर्गयात्री संस्था करत असलेल्या कामाप्रती गौरव करावा ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. निसर्गयात्री संस्थेसोबत अन्य विभागात ज्यांना गौरविण्यात आले अशा सर्व व्यक्ती, संस्था यांचे देखील अभिनंदन. त्याच सोबत एम टी डी सी चे राजेंद्र ताम्हाणे आणि मानसी कोठारे यांचे विशेष आभार. सुधीर (भाई) रिसबूड 9422372020धनंजय ( दादा) मराठे 9423297736ऋत्विज आपटे 7507134624निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी