ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व गांधी नॅशनल मेमोरीयल सोसायटीच्या विश्वस्त सचिव शोभना रानडे यांचे निधन
_ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व गांधी नॅशनल मेमोरीयल सोसायटीच्या विश्वस्त सचिव शोभना रानडे (वय ९९) यांचे रविवारी पहाटे मुंढव्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मृदुला रानडे व सुषमा गरवारे या मुली आहेत.दुपारी चारच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रातिनिधीक स्वरूपात माजी आमदार उल्हास पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. रानडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी ४.३० वाजता नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेस येथे श्रद्धांजली सभा होणार आहे.