
रत्नागिरी जिल्ह्यात लाेटे येथिल रसायन कारखान्यातील स्फोटात झालेल्या जीवित हानीबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत रत्नागिरी जिल्ह्यात लाेटे येथिल रसायन कारखान्यातील स्फोटात झालेल्या जीवित हानीबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, ” महाराष्ट्राच्या रत्नागिरीत रसायन कारखान्यात झालेल्या प्रमादात मृत झालेल्या लोकांप्रती हार्दिक शोक आणि संवेदना व्यक्त करतो. मला विश्वास आहे की, घटनास्थळी बचाव कार्य तत्परतापूर्वक केले जात आहे. या शोकाच्या काळा अपघात प्रभावित परिवारास माझ्या संवेदना. तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना.
www.konkantoday.com