ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांचा राडा
_धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव दौऱ्यावर आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला.मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट मागितली होती. मराठा आरक्षणावर त्यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायची होती. पण राज ठाकरे यांनी भेट नाकराल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती.मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर, धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याचा आजता त्यांचा दुसरा दिवस आहेय. आपल्या दौऱ्यात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 11 विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी आरक्षणाव वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात राज ठाकरे पुष्पक हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काही मराठा आंदोलक पुष्पकहॉटेलमध्ये आले. पण राज ठाकरे यांनी भेटण्यासाठी नकार दिला. त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी हॉटेलमध्येच घोषणाबाजी सुरु केली. राज ठाकरे काय म्हणाले होतेमराठा-ओबीसी आरक्षणावरून राज ठाकरेंनी भाष्य केलंय. माथी भडकवून मतं हातात घेण्याचा उद्योग आहे. कुणाच्यातरी खांद्यावर बंदूक ठेवून मतांचं राजकारण सुरू असून, अशा व्यक्तींना निवडणुकीवेळी दूर ठेवा असं राज ठाकरेंनी म्हटलंय. “बाहेरच्या राज्यांमधून मुलं येतात आणि आपल्या राज्यातील नोकऱ्या बळकावतात.आपल्या राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात. आपल्या मुला मुलींना मिळत नाही. ठाणे, पुणे, नागपुरात ज्याप्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रीज आणि इतर सगळ्या गोष्टी मूळच्या लोकसंख्येसाठी नाही तर बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी होतातम्हणजे बाहेरुन येणाऱ्या लोकांचा लोंढा किती मोठ्या प्रमाणात आहे. येथे या शहरात आल्यानंतर त्यांची व्यवस्था करण्यात सरकारचा इतका पैसा खर्च होतो. राज्यात इतक्या गोष्टी उपलब्ध असताना महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्रातील मुला मुलींना आधी प्राधान्य द्या आणि उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा असं मी आधीपासूनच सांगत आहे’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत.