रत्नागिरी शहराचा कायापालट करण्याचा ध्यास येत्या वर्षात परदेशातील पर्यटक रत्नागिरी बघायला येतील- उदय सामंत

रत्नागिरी शहरातील प्रभाग २ ची सभा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले,रत्नागिरी तालुक्यातील माझ्या मतदार संघातील ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केलेय. मात्र विकास करत असताना रत्नागिरी शहराला प्रत्येक कामात निधी देण्याचे काम माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी केले आहे. आज शब्द देतो येत्या काही दिवसात महाराष्ट्रच्या नकाशात रत्नागिरीचे नाव उजळताना दिसेल.२००४ पासून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय.आजच्या बैठकीमुळे परवाच्या आंदोलनाला उत्तर मिळाले हे सत्य आहे. ते पुढे म्हणाले,माझ्या तिकीटा अगोदर तुमच्या लाडक्या स्मितल पावसकर आणि निमेश नायर यांचे तिकीटाचा नक्कीच विचार केला जाईल. मात्र माझी निवडणूक त्यांच्या अगोदर आहे त्यामुळे मला भरगोस मतांनी प्रभाग क्र. २ मधील जतना मतदान करेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ते रत्नागिरी शहरात पडलेले रस्त्याला खड्डे आहेत हे नाकारता येत नाही. मात्र झालेला पाऊस याला कारणीभूत असून यां नैसर्गिक आपत्तीला आपण स्वीकारला पाहिजे. मात्र दुसरी कडे मी जे रत्नागिरीकरांना आश्वासन दिले होते ते काँक्रिटीकरणाचे काम मी प्रामाणिक पणे सुरु केले. आज माझा आत्मविश्वास वाढलाय माझ्या विरोधात किती ही विरोधकानी बोंबा मारल्या तरी पुढचा आमदार उदय सामंत हे तुमच्या आशिर्वादामुळे नक्की झाले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकार ने विविध योजना आणल्या आहेत त्या योजनांचे लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खोटा प्रचार करून मुस्लिम आणि दलित बांधवाना भडकवण्यात आले त्यामुळे विरोधात मतदान झाले. मात्र आज सांगतो जो पर्यत सूर्य आणि चंद्र आहे तो पर्यत नाही देशाचे संविधान बदलले जाणार तर कोणत्याही मुस्लिम समाजाला देशाच्या बाहेर काढले जाणार. मी जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. रत्नागिरी हा एकमेव जिल्हा असेल की या जिल्ह्यात असणारे सर्व समाज बांधवांचे समाज हॉल माझ्या एमआयडीसी मधून 3 गुंठे जागेत होणार आहेत. रत्नागिरी विकासाच्या आणि पर्यटनच्या दृष्टीने काय काय आहे हे मी मिनी आर्ट गॅरेलीच्या माध्यमातून १५ ऑगस्टला उदघाटन करून दाखवणार आहे रत्नागिरी हे एक शैक्षणिक हब आहे. जगातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज रिसरच सेंटर दुसरं कुठे नाही तर ते तुमच्या रत्नागिरीत होणार आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होईल की नाही हे माहित नाही मात्र रत्नागिरी अरबी समुद्रात उभा असेल असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रत्नागिरीत होणार हेच खरे रत्नागिरीचे वैभव आहे.रत्नागिरी ही भाग्यवान भूमी आणि त्याचा मी आमदार आहे म्हणून मी संस्कृती जपणारा कार्यकर्ता आहे. विरोधक असणे गरजचे आहे मला विरोधकांशी चर्चा करून मार्ग काढणारा मंत्री आहे असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. यावेळी जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, उपजिल्हा प्रमुख राजन शेट्ये, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, उद्योजक भाऊ देसाई, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक निमेश नायर, अभिजीत दुडीये तसेच समस्त प्रभाग क्र. २ मधील नागरिक, महिला वर्ग, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button