
एस.टी. महामंडळाच्या प्रवाशांसाठी विविध २५ योजना
रत्नागिरी ः सुरक्षित प्रवासासाठी प्रसिद्ध असलेल्या एसटीतून ये-जा करणार्यांसाठी महामंडळातर्फे विविध २५ योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनांद्वारे प्रवाशांना २ कोटी ५१ लाख रुपयांची सवलत देण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक विजयकुमार दिवटे यांनी दिली.
एप्रिल अखेरपर्यंत सुमारे ८ लाख ११ हजार प्रवाशांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतला आहे. महामंडळाने जाहीर केलेल्या सर्व योजनांचा लाभ प्रवाशांना मिळावा यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयांसह प्रत्येक एसटी आगारामार्फत सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. विविध योजना, सवलतींमुळे अनेक प्रवाशांनी एस.टी.लाच पसंती दिली आहे. हात दाखवा एसटी थांबवा हा उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबविला जात आहे.