महसूल पंधरवडा जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची अधिकारी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता
रत्नागिरी, दि.4 (जिमाका) : महसूल पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसिलदार कार्यालय आदी परिसराची आज महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली.* निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसिलदार राजाराम म्हात्रे, तहसिलदार तेजस्वीनी पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते.