
भारताचे माजी दिग्गज स्पिनर दिलीप दोशी यांचं निधन
भारताचे माजी स्पिनर दिलीप दोशी यांचं निधन झालं आहे. दिलीप दोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने लंडनमध्ये निधन झालंय.दिलीप दोशी यांनी 23 जून रोजी अखेरचा श्वास घेतला. ते 77 वर्षांचे होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दिलीप दोशी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. दिलीप दोशी यांनी वयाच्या 32 व्या वर्षी कसोटी पदार्पण केलं. दोशींनी अवघ्या 4 वर्षांमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण केलं. त्यानंतर दोशी क्रिकेटपासून लांब गेले. दोशी यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर आत्मचरित्रही लिहिलं. ‘स्पिन पंच’ असं दोशी यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे.