लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी जाती धर्मात निर्माण केलेली तेढ दूर करून कोकण व रत्नागिरीचा विकास करण्यासाठी काम करूया- नारायण राणे
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी जाती धर्मात निर्माण केलेली तेढ दूर करून हे कोकण व रत्नागिरीचा विकास करण्यासाठी काम करूया यासाठी आवाश्यक निधी आम्ही उपलब्ध करून देऊ येत्या पाच वर्षातील विकासाचा आराखडा तयार करूया आणि कामाला लागूया असे आवाहन खा. नारायण राणे यांनी आज रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केलेपंतप्रधान नरेंद्र मोदींपासून आपले वरिष्ठ नेते प्रत्येक क्षण या देशासाठी आणि पक्षासाठी प्रत्येक क्षण देतात, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षनिष्ठा ठेऊन रत्नागिरीत पक्ष भक्कम करा आणि आपला हक्क ठणकावून मागा अशा शब्दात माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीतील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.रत्नागिरी शहरात आज चिपळूण- संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा राजापूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासाठी जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबोधित करताना खा. राणे बोलते होते. ते म्हणाले आगामी विधानसभा निवडणूक जवळ आल्या असताना आपलं सरकार पुन्हा यावं यासाठी हि बैठक महत्वाची आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे यासाठी हि बैठकमहत्वाची आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे यासाठी हि बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगती पथावर नेले आहे. महिला, कृषी, बेरोजगार, गरीब अशा समाजातील प्रत्येक घटकांसाठी त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना कुठलीही जात पाट धर्म पाहिला नाही. लोकसभा निवडणुकीत हि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडलो आहोत असे खा. राणे म्हणाले.रत्नागिरीतील पक्ष संघटना भक्कम करा असे सांगत खा. राणे म्हणाले कि पक्षाला मजबूत करण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतारा, आपल्या नेत्याबद्दल कोणी काहीही विरोधात बोलले तर निषेध करण्यासाठी तत्काळ रस्त्यावर उतरा. गेले काही दिवस उद्धव ठाकरे, जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत अशावेळी पक्ष म्हणून आपल्या नेत्याच्या पाठही भक्क्म उभे राहा. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या बूथ मध्ये आपण मागे आहोत त्या बुथमधील विरोधातील प्रत्येक लोकांना भेटा. उद्धव ठाकरे हे स्वार्थी आणि सायकिक आहे, ते तुमचं भलं करणार नाही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जातीपातीचे धर्माचे राजकारण करत आहेत तर पंतप्रधान मोदी मात्र देशातील जनतेच्या विकासासाठी अहोरात्र काम करत आहेत हे या लोकांपर्यंत पोहोचावा असेही आवाहन त्यांनी केले