रायगड जिल्ह्यातील जे यात्रेकरू केदारनाथ येथे यात्रेसाठी गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबीयांसाठी सूचना
केदारनाथ खोर्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या आपत्तीमध्ये पर्यटक व यात्रेकरु अडकून पडले आहेत. रायगड जिल्ह्यातील जे यात्रेकरू केदारनाथ येथे यात्रेसाठी गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष रायगड येथे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्याशी 02141-222118 , 02141-222097.अथवा 8275153363 या क्रमांकावर संपर्क साधाव. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्हा रायगड मधील महाड येथून संदीप झानजे यांच्यासह 10 जणांचा ग्रुप केदारनाथ येथे यात्रेसाठी गेले होते त्यापैकी 8 जण हरिद्वार येथे सुखरूप पोहाचले आहेत. गोपाळ पांडुरंग मोरे (8275131246) आणि सुदाम राजाराम मोरे (9404791451) हे केदारनाथ मंदिराजवळील हेलिपॅड येथे अडकले आहेत. त्यांचे समवेत महाराष्ट्रातील इतर साधारण 120 नागरिक त्याठिकाणी अडकले आहेत. हवामान खराब असल्यामुळे यात्रेकरूंना हेलिकॉप्टर द्वारे प्रवास करता येत नाही. सर्व जण सुरक्षित असून टप्या टप्याने यात्रेकरूंना खाली सोडत आहेत.महाराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात आला असून आज रात्री पर्यत सर्वांना बाहेर काढण्यात येईल असे कळविले आहे. तथापि आवश्यक वैद्यकीय व इतर मदत करण्याची विनंती केली आहे.