नागरिकांना जाहीर आवाहन,
दिनांक 03/08/2024 रोजी 02.10 वा. चे सुमारासडी मार्ट च्या पुढे वसई फाट्याजवळ मुंबई -गुजरात वाहिनी च्या डिव्हायडर मध्ये वाहनचालक GJ 12BY 2255 याचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर गाडी ही पलटी झाली. सदर गाडीत हायड्रोजन गॅसच्या टाक्या असल्याने त्या खाली रोड वरती आपटल्याने त्यास आग लागली. सदर आग ही फायर ब्रिगेड, वसई च्या साह्याने बुजविण्याचे काम चालू असून ,सदर वेळी मुंबई व गुजरात वहिनी वरील सर्व वाहतूक सुरक्षित अंतरावर थांबवून ठेवली आहे. वाहतूक अद्याप सुरळीत झाली नाही.घोडबंदर रोड मार्गे जाणारी अवजड वाहने वाहतुक थांबविण्यात आली असून,इतर कार चालक यांनी घोडबंदर मार्गे अहमदाबाद हायवे जानेसाठी इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अशी ठाणे वाहतुक शाखे मार्फत विनंती करण्यात येत आहे.