हिंदू समाजाबद्दल अश्लील बोलणार्या महिलेविरुद्ध अखेर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
चिपळूण शहरात निघालेल्या हिंदुत्ववादी संघटनाच्या मोर्चामध्ये हिंदू समाजाबद्दल अश्लील बोलणार्या महिलेविरुद्ध अखेर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आसमा हनिफ परकार असे या महिलेचे नाव आहे. उरण येथे यशश्री शिंदे या युवतीची निर्घुण हत्या आणि तिच्या मृतदेहाची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. याच्या निषेधार्थ चिपळूण येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन चिपळूण शहरात आंदोलन केले होते.यावेळी अचानक आसमा हनीफ परकार ही महिला तिथे आली आणि तिने हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केले. त्यानंतर तेथे उपस्थित आंदोलन कर्त्यांनी या महिलेवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी करत चिपळूण पोलीस स्थानकात ठिय्या केले.अखेर चिपळूण पोलिसांनी तक्रार दखल करून घेत या आसमा परकार हिच्याविरुद्ध चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे