जुन्या योजनेच्या विहिरीवर पंप बसवल्याने होळीतील संतप्त महिलांकडून पाण्याचा पंप थेट कार्यालयात जमा
_राजापूर तालुक्यातील होळी सडेवाडीकरिता राबवण्यात येणार्या नळपाणी योजनेसाठी स्वतंत्रत्र विहिरीची आवश्यकता असताना जुन्या योजनेच्या विहिरीवर पंप बसवून योजना राबवण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे संतप्त झालेल्या होळी गावातील महिलांनी पंप काढून थेट पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात बुधवारी जमा केला. सरपंच मनमानी करत असून जलजीवन मिशन योजनेच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोपही या महिलांनी केला आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना दिले आहे.होळी गावात पूर्वी पासूनच होळी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. या योजनेतून गावातील ८३ कुटुंबाना नियमित पाणीपुरवठा होतो. अत्यंत चांगल्या प्रकारे स्थानिक ग्रामस्थ ही योजना राबवत असून यासाठी ग्रामपंचायत कोणतेही सहकार्य करत नाही. जलजीवन मिशन योजनेंतर्गत होळी सडेवाणी पाणीपुरवठा दुरूस्ती योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी सुमारे २५ लाख ३६ हजार रुपयांचा निधीही मंजूर आहे. या योजनेतून सुमारे २१६ कुटुंबाना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. www.konkantoday.com