शेतकर्यांच्या वीजबिल माफी संदर्भात जीआर निघाला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
शेतकर्यांच्या वीज बिल माफी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा जीआर राज्य सरकारने काढलेला आहे.पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचे बिल भरण्याची गरज नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. आगामी वर्षानंतर राज्यात आमचेच सरकार पुन्हा येणार आहे. तेव्हा आम्ही पुन्हा वीज बिल माफ करू. असा विश्वासह फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवला आहे. आज उपराजधानी नागपूर येथे पार पडलेल्या डीपीडीसीच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली आहे.