लोटेतील पुष्कर कंपनीतही पुन्हा वायूगळती
लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीत झालेल्या वायूगळतीची घटना ताजी असतानाच श्री पुष्कर केमिकल्स ऍण्ड फर्टिलायझर्स कंपनीतही बुधवारी सायंकाळच्या सुमारास दुसर्यांदा झालेल्या वायूगळतीने खळबळ उडाली. मात्र कंपनी प्रशासनाने वायूगळती नियंत्रणात आणल्याने कोणालाही त्रास झाला नसल्याचे समजते. www.konkantoday.com