भारतीय जनता पक्षाला (BJP) आगामी विधानसभा निवडणुकीतही मोठा धक्का बसण्याची शक्यता
राज्यात लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या भारतीय जनता पक्षाला (BJP) आगामी विधानसभा निवडणुकीतही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ 55 ते 60 जागाच जिंकता येतील, असा निष्कर्ष पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आला आहे.त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे बोलले जाते, काही इंग्रजी वृत्तमाध्यमांनी यासंबंधिचे वृत्त दिले आहे.गत दोन विधानसभा निवडणुकीत भाजपला 100 हून अधिक जागा जिंकण्यात यश आले आहे. 2014 मध्ये भाजपने स्वबळावर 122 जागा जिंकल्या होत्या. तर 2019 मध्ये युतीत 105 जागांवर यश मिळाले होते. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने राज्यातील लोकसभेच्या 23 जागा जिंकल्या होत्या. पण यंदा भाजपची लोकसभेत अत्यंत सुमार कामगिरी राहिली.