रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींना शिकवायला अभिव्याख्यातेच नाहीत
रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश मिळवून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींना शिकवायला अभिव्याख्यातेच नाहीत. मेकॅट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम २०२३-२४ मध्ये पहिली बॅच पदविका धारण करून बाहेर पडली. तरी अजूनही अभ्यासक्रमासाठी पायाभूत सुविधांसह अधिव्याख्यात्यांची वानवा आहे. मंजूर पदांपेक्षा ५० टक्केपेक्षा कमी अधिव्याख्याते संस्थेत कार्यरत आहेत. रिक्त पदांमुळे तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यात्यांची नेमणूक करून काम चालविले जाते. शासनाने तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीही थांबविल्याने इंजिनिअरिंगचे स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे, तर दुसरीकडे मागील शैक्षणिक वर्षात तासिका तत्वावर विद्यार्थ्यांना शिकविणार्या अधिव्याख्यात्यांना सप्टेंबर २०२३ पासूनचे मानधन दिले गेले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.www.konkantoday.com