
निवृत्त शिक्षकास मारहाण; आरोपीला १ महिन्याची सक्तमजुरी
राजापूर तालुक्यातील ओणी येथील निवृत्त शिक्षक रमेश निवृत्ती जाधव यांना मारहाण करणाऱ्या ओणी येथील प्रवीण मनोहर गुरव याला १ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.ओणी येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक रमेश निवृत्ती जाधव व प्रवीण मनोहर गुरव यांच्यात १० फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ८.४५ वा. चारचाकी व दुचाकीच्या किरकोळ अपघातावरून वाद झाला व त्याचे मारहाणीत पर्यावसान झाले होते.
याबाबत राजापूर न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून आरोपी प्रवीण मनोहर गुरव याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम २४८(२) नुसार दोषी ठरवण्यात आले आहे आणि जखमीची माहिती देणाऱ्या रमेश निवृत्ती जाधव यांना गंभीर दुखापत केल्याबद्दल त्याला एक महिना सक्तमजुरीची शिक्षा आणि १,००० रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली. याकामी सरकारी वकील ओमकार गांगण व अॅड. भालचंद्र सुपेकर यांनी काम पाहिले.