
आंबा घाटात अवजड वाहनांना वाहतुकीस खुला होण्यासाठी अजून प्रतीक्षाच
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबा घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. त्याचबरोबर रस्ता तीन ठिकाणी खचला होता. यामुळे सुमारे १५ दिवस घाट बंद होता. त्यानंतर दुरूस्ती करून केवळ लहान चारचाकी वाहनांसाठी हा मार्ग सुरू करण्यात आला. सध्या घाटात चारचाकी वाहनांची वाहतूक सुरळीत आहे. मात्र या मार्गावरून जाणार्या अवजड वाहनांना घाट वाहतुकीस खुला होण्यासाठी अजून प्रतीक्षाच करावी लागणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्यांनी दिली. www.konkantoday.com