
उद्धव ठाकरेना महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे….अतुल काळसेकर भाजप प्रदेश उपाध्यक्ष
मुस्लिम आणि ख्रिश्चन कम्युनिटीच्या जोरावर उद्धव ठाकरे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, यांना संपवण्याची भाषा करत आहेत. सरळ साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर.. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे….उद्धव ठाकरे, 2019 नंतर तुम्ही देवेंद्रजीना संपवण्याचा प्लॅन केला होता. पण, ते संपले नाहीत, तुम्ही मात्र संपलात. हा खूनशीपणा सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे. मुघलांना जसे सगळीकडे संताजी धनाजी दिसायचे तसेच उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना देवेन्द्रजी फडणवीस दिसत आहेत.देवेंद्र फडणवीस यांना संपवायची भाषा करणाऱ्या उद्धवजींना हा लोकसभेत मिळालेल्या रंडक्या यशाचा आलेला माज आहे.महाराष्ट्राची जनता हा माज नक्की मोडेल.. अश्या धमक्यांना कोणीही घाबरत नाही. ज्या मुस्लिमांच्या मतावर तुम्ही राजकारण करत आहात, राज्यातील 90 टक्के हिंदू उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. तुम्ही अडीच वर्षात काय केलं याचा सगळा हिशोब जनतेकडे आहे. योग्य वेळी जनता धडा शिकवेल.कोकण विभागात प्रत्येक मंडळात उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षात केलेल्या गैरकारभाराचा पर्दाफाश जनतेसमोर करणार असे प्रतिपादन ही काळसेकर यांनी केले.