
खेड शिवाईनगर येथे चोरी
खेड : शहरातील शिवाईनगर येथे घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या उघड्या पडवीतील
१-हजार ५०० रू. किमतीच्या शिलाई मशीनच्या लोखंडी स्टॅडची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार संतोष गंगाराम शेले (४२ रा. शिवाईनगर, खेड) यांनी पोलिस ठाण्यात दिली. ही घटना ३ जुलै रोजी रात्री १० ते दि ४ जुलै रोजी पहाटे ५ ४५ वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष शेले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी संशयिताला ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.