फवारणीचे औषध प्राशन करून ६६ वर्षीय सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
फवारणीचे औषध प्राशन करून ६६ वर्षीय सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील विवली पागारवाडी येथे मंगळवारी रात्री १० ते आज बुधवारी सकाळी १० या कालावधीत घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आप्पासाहेब खानविलकर (वय ६६) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश खानविलकर लांजा एसटी आगारातून वाहतूक नियंत्रक सेवानिवृत्त झाले होते. प्रकाश खानविलकर त्यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते.त्यांचा मुलगा हा लांजा एसटी आगारात मेकॅनिकल म्हणून काम करतो. तो आपल्या पत्नी मुलांसह लांजा येथे राहतो. तर प्रकाश खानविलकर हे दिवसभर आपल्या घरी विवली येथे राहून रात्री ते पुन्हा लांजा येथे मुलाकडे रहायला येत .मात्र काल मंगळवारी ते नेहमीप्रमाणे रात्री घरी आले नव्हते. मात्र पाऊस असल्याने कदाचित ते घरी आले नसावेत असा अंदाज मुलगा प्रतीक याने व्यक्त केला होता.मंगळवारी रात्री वडील प्रकाश खानविलकर हे घरी का आले नाहीत हे पाहण्यासाठी मुलगा प्रतिक हा आज बुधवारी सकाळी १० वाजता विवली पागारवाडी येथील घरी गेला असता प्रकाश खानविलकर हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी फवारणीचे औषध प्राशन केल्याचे आढळून आले .