चंगु मंगु, दीड फुटे, शहाणे हे मला आव्हान देतात पण मी निवडुन येईल काळजी करु नका, आमदार भास्कर जाधव यांची राणेंवर टीका
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात चांगलेच यश मिळवले. आता विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. असं असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी शिर्डीत मोठं वक्तव्य केलं आहे.विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरु शकते. ठाकरे गटाकडे असलेल्या जागेवर कॉंंग्रेसकडून दावा सांगितला जात आहे, यावर भास्कर जाधव यांनी शिर्डीत कॉंग्रेस नेत्यांना चांगलंच सुनावलं, उद्धव ठाकरेंमुळे कॉंग्रेसचे खासदार निवडून आलेत, याचं भान ठेवा अशा शब्दात राज्यातील कॉग्रेस नेत्यांना जाधव यांनी सुनावलं.शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी वाढदिवसानिमित्त साईबाबांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाव न घेता राणे पिता पुत्रांचाही समाचार घेतला. ते म्हणाले की चंगु मंगु, दीड फुटे, शहाणे हे मला आव्हान देतात पण मी निवडुन येईल काळजी करु नका, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केलाय.