चिपळूण-संगमेश्वर मतदार संघावर उबाठा शिवसेनेचाच हक्क, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मागणी
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्वतःची ७० हजार हक्काची मते आहेत. दोन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निर्विवाद वर्चस्व आहे. नैसर्गिक न्यायाने या विधानसभा मतदार संघावर आपला हक्क आहे. त्यामुळे या विधानसभा मतदार संघातून आपल्या पक्षालाच उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी पदाधिकाारी, कार्यकर्त्यांनी रविवारी पेढांबे येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रविवारी पेढांबे येथील डी स्टार रिसॉर्टमध्ये चिपळूण तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बैठकीचे जाहीर मेळाव्यात रूपांतर झाले. या वेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, विधानसभा क्षेत्र संघटक रोहन बने, तालुकाप्रमुख विनोद झगडे, तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, जि.प. माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, बाळशेठ जाधव, राजू भागवत, सुधीर शिंदे, शहरप्रमुख शशिकांत मोदी आदी उपस्थित होते. www.konkantoday.com