लाडके भाऊ योजनेसाठी जिल्ह्याला ३ हजाराचे उद्दिष्ट
जिल्ह्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३००० तरूणांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे. लाकडी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर या योजनेला लाडके भाऊ योजना असे म्हणण्यात येत आहे.युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध संस्थांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांसाठी पात्रता अटी घालण्यात आल्या आहेत. लघु व मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना महामंडळे, कंपनी कायद्याखाली येणार्या सामाजिक संस्था, सेवा क्षेत्रातील हॉस्पिटल, हॉटेल, कॉल सेंटर आदी संस्था प्राधिकृत केल्या जावू शकतात. किमान ३ वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्रातील संस्थांचा विचार करण्यात येणार आहे.www.konkantoday.com