खवले मांजर तस्करीप्रकरणी आणखी दोघे अटकेत*

*__मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे काळकाई मंदिरासमोर खवले मांजराच्या तस्करीप्रकरणी वनविभागाच्या पथकाने एकास अटक केलेली असतानाच आणखी दोघांना बुधवारी जेरबंद केले. खवले मांजर तस्करीचे रायगड कनेक्शन असल्याचे उघड झाले असून त्या दृष्टीने वनविभागाच्या पथकाकडून सखोल तपास करण्यात येत आहे. दोघांनाही बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता २ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.अनिल धोंडीराम जाधव (रा. नागाव-महाड, जि. रायगड) राजेंद्र रघुनाथ मोरे (रा. दिवीळ-पोलादपूर, जि. रायगड) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button